प्रख्यात अभिनेत्री व भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या मर्सिडीज गाडीने गुरुवारी रात्री अल्टो गाडीला दिलेल्या धडकेत दोन वर्षांचा मुलगा ठार झाला. या अपघातात हेमामालिनी यांनाही दुखापत झाली असून त्यांना येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मथुरा येथून जयपूरकडे जात असताना दौसा येथे हेमा यांच्या गाडीला हा अपघात घडला. अल्टो कारमधून पाच जण प्रवास करत होते. त्यातील दोन वर्षांच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाला.