गुजरातमधील जामनगरच्या भाजप खासदार पूनमबेन माडाम (वय ४१) नाल्याच्या खोल खड्डय़ात पडून जखमी झाल्या आहेत. जलाराम झोपडपट्टीत त्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी गेल्या असता ही घटना घडली. पाहणी करत असताना त्या नाल्याच्या काँक्रीट झाकणावर उभ्या होत्या, पण ते झाकण तुटून त्या आठ फूट खोल नाल्यामध्ये पडल्या. त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईला हलवण्यात आले आहे. नाला कोरडा असल्याने त्यांना बाहेर काढणे सोपे झाले, असे  पोलिसांनी सांगितले. डॉक्टर एस, महेश्वरी यांनी सांगितले, की पूनमबेन यांच्या डोक्याला ४ इंचाची जखम झाली असून, त्यांच्या खांदा व पायाला दुखापत झाली आहे. अतिक्रमणे पाडण्यास झोपडपट्टीत विरोध होत असल्याने त्या या भागात गेल्या असता त्यांची जामनगर महापालिका कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली. लोक कर्मचाऱ्यांना अतिक्रमणे पाडू देत नव्हते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पूनमबेन यांनी केला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. एक्स-रे चाचणीत त्यांच्या हाडांना दुखापत झाल्याचे दिसलेले नाही. उद्या सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक