भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना करोनाची लक्षण आढळून आल्यामुळे, त्यांना गुडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. गुडगावमधील Medanta रुग्णालयात पात्रा यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. करोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्याच आल्याची माहिती सुत्रांनी दिल आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातली बातमी दिली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले पात्रा हे अनेक टीव्ही चर्चांमध्ये भाजपाची बाजू मांडत असतात. याव्यतिरीक्त संबित पात्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची बाजू मांडत असतात. अद्याप त्यांच्या तब्येतीबद्दलची अधिक माहिती समजू शकलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 2:58 pm