23 September 2020

News Flash

महाआघाडी झाली तरी 2019 मध्ये आमचीच सत्ता – अमित शाह

'शिवसेना आमच्यासोबत असल्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे'

अमित शाह

2019 लोकसभा निवडणुकीत आमचीच सत्ता येईल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. सहा राज्यांमध्ये भाजपाचं सरकार होतं, आता 16 राज्यांमध्ये आहे. मग तुम्हीच सांगा 2019 मध्ये कोण विजयी होणार ? असा उलट सवाल अमित शाह यांनी विचारला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये लागलेला निकाल नक्कीच भाजपाच्या बाजूने नव्हता, पण त्याचा संबंध 2019 लोकसभा निवडणुकीशी जोडणं चुकीचं आहे. महाआघाड्यांची चर्चा व्यर्थ असून सत्ता आमचीच येणार आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपा शिवसेना युतीवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सूचक वक्तव्य केलं. 2019 ला शिवसेना भाजपासोबत असेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळला जावा यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अडीच तास बैठक सुरु होती. या बैठकीला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, आशिष शेलार यांच्यासहित अनेक नेते उपस्थि होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या पराभवामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

यावेळी राज्यात मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळला जावा अशी चर्चा झाली. याशिवाय लोकसभा मतदारसंघांबाबत विभागावरही चर्चा करण्यात आली. शिवसेना आमच्यासोबत असल्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असं अमित शाह बोलले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 11:32 am

Web Title: bjp will return to power in 2019 says amit shah
Next Stories
1 संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लवकरच दिसणार अटलजींची प्रतिमा
2 …तर पेट्रोल 10 रुपयांनी होणार स्वस्त, पुण्यात चाचणी सुरु
3 क्लासला जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार
Just Now!
X