31 October 2020

News Flash

केजरीवाल सरकारच्या कारभाराचा भाजप आमदाराने असा केला निषेध…

गुप्ता यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे सभागृहात हशा पिकला.

दिल्ली विधानसभेत अगदीच अल्पमतात असलेल्या भाजपचे सदस्य विजेंदर गुप्ता यांनी शुक्रवारी चक्क सभागृहातील बाकावर चढून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. गुप्ता यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे सभागृहात हशा पिकला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतरांनीही विजेंदर गुप्ता यांच्या या वर्तणुकीला हसून प्रतिसाद दिला. सभागृहाच्या अध्यक्षांनी गुप्ता यांना खाली उभे राहून बोलण्याची सूचना केल्यावरही त्यांनी त्यांचे न ऐकता आपले बोलणे चालूच ठेवले. दिल्ली सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठीच आपण बाकावर चढल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 5:16 pm

Web Title: bjps vijender gupta stand on a bench to protest against delhi govt
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 अफगाणिस्तानात भारतीय महिलेचे अपहरण
2 मोदींच्या टीकेनंतर अमेरिकेनेही पाकला भरला दम
3 US President: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी बराक ओबामांचा हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा
Just Now!
X