News Flash

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, मुख्याधापक आणि शिक्षकांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; मुलगी गर्भवती

डेहरादून येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सीनिअर्सकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

( प्रतिकात्मक छायाचित्र )

डेहरादून येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सीनिअर्सकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल एका महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना घटनेची माहिती असतानाही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच मुख्याध्यापक, हॉस्टेल केअरटेकर आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे.

पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहत होती. विद्यार्थिनीने आजारी पडल्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीकडे खुलासा करत बलात्कार झाला असल्याची माहिती दिली. यानंतर विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचं उघड झालं.

पीडित विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्टच्या आदल्या दिवशी स्वातंत्र्य दिनाची तयारी करायची असल्याचं सांगत आपल्याला स्टोअर रुममध्ये बोलावण्यात आलं आणि बलात्कार करण्यात आला.

‘ही एका महिन्यापुर्वीची घटना असून नुकतीच उघड झाली आहे. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली आहे. शाळा प्रशासनावर आरोप आहे की, मुलगी गर्भवती होऊ नये यासाठी तिला पाण्यातून औषधं देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पीडित मुलीने १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची नावे घेतली आहेत. मुलगी आपल्या बहिणीसोबत बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र राहत होती. मुलीवर बलात्कार झाला असल्याची माहिती मिळताच आई-वडील पोलिसांसोबत शाळेत पोहोचले. यावेळी बालकल्याण विभागाचे अधिकारीही उफस्थित होते. पोलिसांनी उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर मुलीचा जबाब नोंदवला आहे. पोलीस शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:54 pm

Web Title: boarding school student raped by seniors in dehradun
Next Stories
1 ह्युंडईची भन्नाट ऑफर ! नाव सुचवा आणि कार जिंका
2 चंद्रावर जाण्यासाठी आठ कलाकारांना मिळणार मोफत तिकीट
3 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रुग्णालयात दाखल
Just Now!
X