कोलकाता : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्य़ात रविवारी एका भाजप कार्यकर्त्यांचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडला आहे. गणेश राय असे त्याचे नाव असून तो मध्यमवयीन होता. गोघाट भागात खनाटी या त्याच्या खेडय़ाजवळ त्याचा मृतदेह एका झाडाला टांगून ठेवलेल्या अवस्थेत सापडला.

भाजपने असा आरोप केला आहे,की सत्ताधारी तृणमूलने त्याचा खून केला असून तृणमूलने या आरोपाचा इन्कार केला आहे. राय हा शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होता, असे पोलिसांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी  आरोप केला, की राय याचा खून तृणमूलनेच केला आहे.  त्याचा मृतदेह  मध्यरात्री झाडाला टांगण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांना भीती दाखवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले.