News Flash

देशातील सर्वात मोठया डबल डेकर ब्रिजचे लोकार्पण, जाणून घ्या खास गोष्टी

चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात.

पायाभरणीनंतर तब्बल २१ वर्षांनी आज बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे. पाच किलोमीटरच्या या पूलावर रस्ते आणि रेल्वे मार्ग आहे.

बोगीबील पूलामुळे आसामचा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ढेमजी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. या पूलामुळे चार तासाचा वेळ वाचणार आहे. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात अशी या पूलाची बांधणी करण्यात आली आहे.

१) बोगीबील पूलाची रचना स्वीडन आणि डेन्मार्कमधल्या पूलासारखी आहे. युरोपियन पूलाच्या धर्तीवर बोगीबील पूलाची बांधणी करण्यात आली आहे.

२) रेल्वे आणि रस्ते मार्ग असलेला आशियातील हा दुसरा सर्वात मोठा पूल आहे. १२० वर्ष या पुलाचे आयुष्य असेल.

३) या पूलाच्या लोअर डेकवर दोन लाईनचा रेल्वे ट्रॅक असेल आणि सर्वात वरच्या डेकवर तीन मार्गी रस्ता असेल. या पूलामुळे दिल्ली ते दिब्रुगड ट्रेन प्रवासाची वेळ तीन तासांनी कमी होणार आहे.

४) ४.९ किलोमीटर लांबीच्या या पूलासाठी ५,९०० कोटी रुपये खर्च आला आहे. आधी ४.३१ किलोमीटरच्या या पूलासाठी ३,२०० कोटी रुपयांचे बजेट होते.

५) २२ जानेवारी १९९७ रोजी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००२ रोजी या पूलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

६) चीनच्या सीमेजवळ असलेला हा पूल युद्ध प्रसंगात अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या पूलाची बांधणी इतकी भक्कम आहे की, यावरुन रणगाडे सुद्धा सहज जाऊ शकतात तसेच या पूलाच्या तिन्ही मार्गावर एअर फोर्सची लढाऊ विमाने सुद्धा उतरु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 2:36 pm

Web Title: bogibeel bridge inaugrate by prime minister narendra modi
Next Stories
1 भारतामधील अल्पसंख्याकांबद्दल बोलणाऱ्या इम्रान खान यांना कैफची सणसणीत चपराक, म्हणाला…
2 आरबीआय लवकरच आणणार २० रूपयांची नवी नोट
3 नोएडात मोकळ्या जागेत नमाज पठणाला बंदी; पोलीस अधीक्षकांकडून आदेश जारी
Just Now!
X