ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना करोना नियमावलीचाा भंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये मागच्या काही महिन्यांपासून करोनाचा कहर सुरुच आहे. त्यामुळे आरोग्य विषयक नियमावली आणखी कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. त्यात आता राष्ट्रपती बोलसोनारो यांची भर पडली आहे. कायद्यापुढे सर्व समान असल्याचं कारवाईत दिसून येत आहे.

मारान्होमध्ये राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांच्या उपस्थित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना दंड ठोठावण्यात आला आहे. ‘मारान्होमधील कार्यक्रमात करोना नियमांचा भंग झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं योग्य आहे. कायदा हा सर्वांना समान आहे’, असं मारान्होचे राज्यपाल फ्लेव्हिओ डिनो यांनी सांगितलं आहे. ‘राज्यात १००हून अधिक लोकं एकत्र येण्यावर बंदी आहे आणि मास्क घालणंही बंधनकारक आहे’, अशी आठवणही त्यांनी करून दिली. राष्ट्रपती बोलसोनारो यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

…या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं; राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधानांना टोला

यापूर्वी थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. ओचा यांच्याकडून १९० डॉलर म्हणजेच जवळजवळ १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नुकताच थायलंडमध्ये मास्क न घालण्यासंदर्भातील गुन्ह्यासाठी दंड वाढवून ४७ हजार रुपये इतका करण्यात आला आहे.

दिल्लीहून गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत सापडले कोट्यवधी; नोटा मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशीन्स

वर्ल्डोमीटर या वेबसाईटच्या माहितीनुसार जगात करोना रुग्णांच्या यादीत ब्राझील तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या खालोखाल ब्राझीलमध्ये सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी ६० लाख ४७ हजार ४३९ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ कोटी ४४ लाख ६२ हजार ४३२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ४ लाख ४८ हजार २९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ८ हजार ३१८ जणांची प्रकृती गंभीर असून ११ लाख ३६ हजार ७१६ सक्रिय रुग्ण आहेत.