नवी दिल्लीतील अमर कॉलनीत २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघा भावांनी मिळून चार दिवस तरुणीवर बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचं आपल्या कुटुंबाशी भांडण झाल्याने १६ जून रोजी कानपूरहून दिल्लीला आली होती. निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर एक दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी नोकरी शोधण्यासाठी ती लाजपत नगर येथे गेली होती.
लाजपत नगर येथे एका चहावाल्याने तिला घरकाम देण्याचं आश्वासन दिलं. तिला चहाच्या टपरीवरही काम करण्यास सांगण्यात आलं. संध्याकाळी चहावाल्याची दोन्ही मुलं तेथे आली आणि पीडित तरुणीला आपल्यासोबत घेऊन गेले. दोघांनीही सलग चार दिवस तरुणीवर बलात्कार केला.
एके दिवशी दोघे भाऊ झोपले असताना पीडित तरुणीने पळ काढला आणि शेजाऱ्यांकडे मदत मागितली. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 1:26 pm