बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्समधील विमानतळ व मेट्रोमध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ जण ठार झाले असून, २०० जखमी झाले. यामध्ये जेट एअरवेजच्या मुंबईच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश असून ब्रसेल्स हल्ल्याच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रांमधील जखमी मुलगी मुंबईची निधी चाफेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रसेल्सच्या विमानतळावर या स्फोटाने मोठे नुकसान झाले आहे. विमानतळावर एकूण दोन स्फोट झाले नंतर इमारत रिकामी करण्यात आली. जखमींमध्ये जेट एअरवेजचे कर्मचारी अमित मोटवानी आणि निधी चाफेकर हे मुंबईतील अनुक्रमे खार आणि अंधेरी येथील रहिवासी आहेत. अमित आणि निधी विमानतळावर आपल्या सहकाऱ्यांना शोधत असताना हे स्फोट झाले. यामध्ये अमितच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. निधीलादेखील गंभीर दुखापत झाल्याचे समजते. स्फोटानंतर निधी यांचा युनिफॉर्म फाटला होता. जखमी अवस्थेतील निधी मदत मिळेपर्यंत विमानतळावरच्याच एका बाकड्यावर अगतिकासारख्या बसून होत्या. मंगळवारी बॉम्बस्फोट झाल्यानंतर या दोघांचे कुटुंबीय बराच वेळ त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर या दोघांशी संपर्क झाला असून त्यांच्यावर एका स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचे कुटुंबीय लवकरच बेल्जियमला रवाना होणार आहेत.
nidhi