News Flash

उत्तर प्रदेशात बसप स्वबळावरच लढणार, आघाडीची शक्यता मायावतींनी फेटाळली

समाजवादी पक्षच भाजपसोबत युती करणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

बसप उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, ते मायावती यांनी फेटाळले.

२०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी नवी दिल्लीत सांगितले. आम्ही काँग्रेस किंवा भाजप या प्रमुख राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करणार नसून, राज्यातील संपूर्ण ४०३ जागा स्वबळावरच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०१७ मध्ये सुरुवातीलाच उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सध्या नवी दिल्लीमध्ये असलेल्या मायावती संसद भवनाबाहेर पत्रकारांना म्हणाल्या, आमच्या पक्षाची कोणत्याही पक्षासोबत कसलीही आघाडी नाही. आम्ही स्वबळावर राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढविणार आहोत. आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली असल्याची खोटी माहिती समाजवादी पक्षाकडून पसरवली जाते आहे. मात्र, आमची कोणाशीही आघाडी नाही. समाजवादी पक्षच भाजपसोबत युती करणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
बसप उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, ते मायावती यांनी फेटाळले. ती माहिती चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 4:52 pm

Web Title: bsp will not ally with bjp or cong for up 2017 elections mayawati
टॅग : Bsp,Mayawati
Next Stories
1 समान नागरी कायद्यासाठी निर्देश देऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय
2 तिहारमध्ये सुब्रतो रॉयसाठी एसी, वाय-फाय, व्हिडिओ कॉन्फरंसिंग… बिल १.२३ कोटी
3 चीनसह पाकिस्तानचेदेखील भारताला कडवे सागरी आव्हान, जाणून घ्या भारत काय करणार
Just Now!
X