04 August 2020

News Flash

भरदिवसा चोरट्यांनी नाट्यमयरित्या लुटले सहा कोटी!

दिल्लीत लाजपथनगर परिसरात अज्ञात टोळक्याने एका व्यापाराचे तब्बल सहा कोटी रूपये भर दिवसा सापळा रचून नाट्यमयरित्या लुटले. सदर घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

| January 28, 2014 03:43 am

दिल्लीत लाजपथनगर परिसरात अज्ञात टोळक्याने एका व्यापाराचे तब्बल सहा कोटी रूपये भर दिवसा सापळा रचून नाट्यमयरित्या लुटले. सदर घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
दिल्लीतील हा व्यापारी आपल्या होंडा सिटी कारमधून सहा कोटींची रोकड बँकेत जमा करण्यासाठी घेऊन जात होता. त्यावेळी चोरट्यांनी व्यापाऱयाच्या कारला मागून मुद्दाम धडक दिली. तसेच पुढे जाऊन या व्यापाऱयाची कार थांबविली आणि त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.
भांडणाच्या कारणाने त्याला गुंतवून ठेवले इतक्यात चार चोरांची आणखी एक टोळी मागून आली आणि व्यापाऱ्याची होंडा सिटी कार घेऊन ही टोळी फरार झाली.
व्यापाऱयाशी हुज्जत घालत असलेल्यांनीही तेथून पळ ठोकला आणि पुढे जाऊन कारमधून तेही फरार झाले. दरम्यान, चोरट्यांनी आपली कार जागीच सोडली होती. व्यापाऱयाने पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी चोरट्यांची कार ताब्यात घेतली आहे आणि पुढील चौकशीला सुरूवात केली आहे. या होंडा सिटी कारमध्ये सहा कोटी रोकड असल्याची माहिती व्यापाऱयाने दिली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2014 3:43 am

Web Title: businessman robbed of rs six crore in lajpat nagar
टॅग Robbery
Next Stories
1 दिल्ली उच्च न्यायालयाची केजरीवाल, सोमनाथ भारतींना नोटीस
2 मोदी सरकारची २००२ च्या दंग्यांना चिथावणी-राहुल गांधी
3 आंध्र प्रदेश विभाजनाचे विधेयक फेटाळण्याचा किरणकुमार रेड्डींचा विधानसभेत प्रस्ताव
Just Now!
X