News Flash

प्रेयसीच्या खोलीत नको त्या अवस्थेत पकडलं, प्रियकराची हत्या

लपूनछपून प्रेयसीला घरी भेटायला जाणं एका २४ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं.

लपूनछपून प्रेयसीला घरी भेटायला जाणं एका २४ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं. प्रेयसीच्या भावाने तिच्या खोलीत दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर मुलीचे कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी या तरुणाला ठेचून मारलं. सूरज पाल असे मृत युवकाचे नाव असून तो शेरपूर गावचा रहिवासी आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दोघेही प्रणयात रमलेले असताना प्रेयसीचा भाऊ गौतम अचानक तिथे येऊन धडकला. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. गौतमला तिथे पाहून गोंधळून गेलेल्या सूरजने गौतमवर गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून गावकरही घराच्या दिशेने धावले. गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी सूरजला पकडलं व बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

सूरजला रुग्णालयात नेण्यात आले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. गौतमला लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुलीचे वडिल आणि भाऊ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 2:21 pm

Web Title: caught in girlfriend room boy thrashed to death by family members villagers
Next Stories
1 हिंदीची सक्ती : विरोधानंतर केंद्र सरकार बॅकफुटवर
2 ट्विट्स आपोओप डिलीट होत असल्याने सुरेश प्रभू चिंतेत, ट्विटर इंडियाकडे तक्रार
3 NSA अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
Just Now!
X