अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप असलेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुराव्यांअभावी हे प्रकरण गुंडाळावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
मुलायम सिंग यादव यांच्या सनदी लेखापालांनी (सीए) मुलायम यांच्या मालमत्तेबाबत पुराव्यांसह सर्व स्पष्टीकरण तपासादरम्यान दिले असल्याने येत्या दोन दिवसांत हे प्रकरण गुंडाळण्यात येणार असल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले.
१ मार्च २००७ रोजी विश्वनाथ चतुर्वेदी यांनी यादव कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने यादव यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, असे आदेश केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.
‘मुझफ्फरनगर हिंसाचार प्रकरणी शेवटपर्यंत आमचे लक्ष राहील’
नवी दिल्ली:मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्त भागातील हिंसाचार, दंगली, तेथील पुनर्वसन कार्य यावर आमचे शेवटपर्यंत लक्ष राहील, असा इशारा देतानाच मुझफ्फरनगरमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपण कोणती पावले उचलली, याचा अहवाल सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारला दिला. मुझफ्फरनगरमधील परिस्थितीबद्दल आपण सजग असून यापुढेही आवश्यकता भासल्यास आदेश जारी करण्यात येतील, असे सरन्यायाधीश पी. सत्यशिवम् यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
मुलायम यांना सीबीआयचा दिलासा
अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप असलेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
First published on: 20-09-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi set to close disproportionate assets case against mulayam singh yadav