News Flash

आज लागणार CBSE दहावीचा निकाल

रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधी केली घोषणा

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

आज दुपारी १२ वाजता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधी घोषणा केली. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

cbse.nic.in , cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहायला मिळणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या तारखेची माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून तसंच डिजिलॉकरमधूनही आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे. “माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसंच उर्वरित पेपर जुलै महिन्यात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित पेपर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. दिल्लीतील सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्चट वर्क आणि असाईनमेंट्सच्या आधारावर जाहीर केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:32 pm

Web Title: cbse class 10th result 2020 to release tomorrow hrd minister pokhriyal jud 87
Next Stories
1 दुर्दैवी! करोनाच्या लढाईत झोकून काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा संसर्ग झाल्याने मृत्यू
2 काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी
3 “गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोपर्यंत…”; उमा भारतींची तिखट प्रतिक्रिया
Just Now!
X