News Flash

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई बोर्डाची कारणे दाखवा नोटीस

रायन इंटरनॅशनल स्कूलने सुरक्षेचे निकष पाळले नसल्याचा ठपका

रायन इंटरनॅशनल स्कूलला कारणे दाखवा नोटीस

गुरुग्राममधील भोंडसी या ठिकाणी असलेल्या रायन इंटरनॅशल स्कूलला सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे. मागील शुक्रवारी अर्थात ८ सप्टेंबरला याच शाळेत प्रद्युमन ठाकूरची हत्या झाली होती. शाळेच्या स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह आढळून आला होता. याच प्रकरणी आता सीबीएसई बोर्डाने स्पष्टीकरण मागितले आहे. सुरक्षेचे योग्य निकष का बाळगले नाही, हा प्रश्नही विचारण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत शाळा प्रशासनाने या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रायन इंटरनॅशनल स्कूलकडून आम्ही पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीला काय उत्तर येते त्यावरून आम्ही आमची पुढची कारवाई ठरवणार आहोत, असे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गुरुग्रामच्या शाळेत प्रद्युमन हत्या प्रकरण घडल्यानंतर सीबीएसई बोर्डाने द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानंतरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

रायन इंटरनॅशनल स्कूल या शाळेने जर आपली जबाबदारी आणि सुरक्षेचे सगळे निकष डोळ्यात तेल घालून पाळले असते तर निष्पाप प्रद्युमनची हत्या टळू शकली असती, हा मुद्दा सीबीएसई बोर्डाच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शाळा प्रशासनाने एवढ्या मोठ्या घटनेबाबत पोलीस आणि शिक्षण विभागाला माहिती देण्यात निष्काळजीपणा दाखवला असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

प्रद्युमनच्या मृत्यूची घटना प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितली शाळा प्रशासनाने नाही. एवढेच नाही तर शाळेच्या परिसरात शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नसल्याचीही बाब अधोरेखित झाली आहे. सद्यस्थितीत जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यातील बहुतांश कॅमेरे बिघडलेले आहेत. याचमुळे रायन इंटरनॅशनल स्कूलला हा निष्काळजीपणा का केला? हे विचारण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे असे सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे. आता या नोटिशीला शाळा काय उत्तर देणार? तसेच यानंतर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 6:56 pm

Web Title: cbse issues show cause notice to ryan international schools bhondsi branch
Next Stories
1 आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार १५ टक्के कापला जाणार
2 …अन् कर्करोग पीडितेला झाली एचआयव्हीची लागण
3 जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, २ दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X