हैदराबाद येथे माहिती तंत्रज्ञान गुंतवणूक क्षेत्र(आयटीआयआर) उभारण्याच्या प्रस्तावाला आज शक्रवार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी २ लाख १९ हजार कोटी एवढा खर्च अंदाजित आहे. तसेच यामुळे जवळपास १५ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.
‘आयटीआयआर’ला मान्यता दिली असून त्यासाठी काही अटींची पूर्तता करणे बाकी असल्याचे माहिती व दूरसंचार मंत्री मनिष तिवारी यांनी दिली आहे. तसेच एकूण गुंतवणुकीपैकी माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्र १ लाख १८ हजार कोटी रुपयांची व इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादन क्षेत्र १ लाख १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आकर्षिक करेल असे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.