01 March 2021

News Flash

अभिनेते विशाल आनंद यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

'चलते चलते' हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट होता.

विशाल आनंद

बॉलिवूड अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ‘चलते चलते’, ‘सारे गामा’, ‘दिल से मिले दिल’ आणि ‘टॅक्सी ड्राइव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशाल आनंद यांचं खरं नाव भीष्म कोहली आहे. त्यांनी जवळपास अकरा चित्रपटांमध्ये काम केलं. काही चित्रपटांचे ते निर्माते व दिग्दर्शकसुद्धा होते.

‘चलते चलते’ हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट होता. त्यामध्ये विशाल आनंद यांनी सिमी गरेवाल यांच्यासोबत काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 12:05 pm

Web Title: chalte chalte actor vishal anand dies due to prolonged illness ssv 92
Next Stories
1 अयोध्येतील मशीद उभारणीसाठी पहिले देणगीदार ठरले रोहित श्रीवास्तव
2 काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी
3 देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला ६६ लाखांचा टप्पा
Just Now!
X