इस्लामी दहशतवाद्यांनी ‘शार्ली एब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला केल्यानंतर पुन्हा मुखपृष्ठावर प्रेषित मोहम्मदाचे व्यंगचित्र छापण्याच्या या नियतकालिकाच्या निर्णयाचा अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी निषेध केला आहे. बुधवारी प्रकाशित झालेला ‘शार्ली एब्दो’चा अंक शेरीफ व सईद कोआशी बंधूंनी ७ जानेवारी रोजी कार्यालयावर हल्ला करून १२ जणांचा बळी घेतल्यानंतरचा पहिलाच अंक होता.  मुखपृष्ठावर प्रेषिताचे व्यंगचित्र छापणे हा पवित्र इस्लाम धर्माचा आणि मुस्लीम जगताचा अपमान असल्याचे तसेच देशाच्या वतीने त्याचा निषेध करीत असल्याचे अध्यक्षांनी त्यांच्या प्रासादातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.