11 August 2020

News Flash

चेन्नईतील इमारत दुर्घटनेत नऊ जण मृत्युमूखी

दिल्लीपाठोपाठ आज (रविवार) चेन्नई येथेसुद्धा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जण मृत्युमूखी पडले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम

| June 29, 2014 12:16 pm

दिल्लीपाठोपाठ आज (रविवार) चेन्नई येथेसुद्धा इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नऊ जण मृत्युमूखी पडले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखालून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अजूनपर्यंत सुरू आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या जखमींना नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी पाच जणांची ओळख पटवण्यात यश आले असून, यापैकी चार जण आंध्रप्रदेशचे रहिवासी असल्याचे समजते. अद्यापपर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली नक्की किती जण अडकले आहेत, याची निश्चित माहिती मिळालेली नाही. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा ढिगारा हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, त्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, ढिगाऱ्याखालून उर्वरित लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या एस.पी. सेल्व्हन यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2014 12:16 pm

Web Title: chennai building collapse death toll rises to nine rescue operations still on
Next Stories
1 सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील राजदूतांची बैठक
2 संशयित खातेदारांची माहिती देण्याबाबत भारत सरकारची स्वित्झर्लंडला विनंती
3 मोदी गुरुजींची शाळा!
Just Now!
X