14 July 2020

News Flash

प्रियकाराने केला बलात्कार आईने शूट केला व्हिडिओ; असा झाला प्रकरणाचा भांडाफोड

या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून या आई-मुलाने चार लाख उकळले

आईने शूट केला व्हिडिओ

छत्तीसगडमधील बलौदाबाजार जिल्ह्यामध्ये एका तरुणीवर बलात्कार करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या मुलाला आणि आईला पोलिसांना अटक केली आहे. बालौदाबाजार पोलिसांनी बुधावारी केलेल्या या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या मुलाचा नावे मनीष बारले (१९) असून त्याची आई शकुन हिलाही अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

हे प्रकरण २०१७ चे आहे. एक २०१७ वर्षीय तरुणी मनीषच्या प्रमात पडली. तिचा विश्वास जिंकल्यानंतर मनीषने तिला आपल्या घरी बोलवले. या मुलीची मनीषने आपल्या आईशी ओळख करुन दिल्याची माहिती या प्रकरणाबद्दल बोलताना सिगमा पोलीस स्थानकाचे प्रभारी असणाऱ्या सी.आर. चंद्रा यांनी दिली. मनिषच्या घरी या तरुणीने खाल्लेल्या पदार्थांमध्ये शकुनने गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे या तरुणीला गुंगी आल्यानंतर मनिषने तिच्यावर बलात्कार केला. मनिषच्या आईने मनिष त्या तरुणीवर बलात्कार करत असतानाचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मनिषने शकुन, मेहुणा दिलीप जांगडे आणि बहिणीच्या मदतीने या मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

प्रकरण कसे उघड झाले

या तरुणीला तिच्या वडिलांनी संभाळण्यासाठी दिलेल्या पैशांसंदर्भात विचारणा केली त्यावेळी हे सर्व प्रकरण उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या तरुणीच्या वडिलांनी आपल्या मालकीचा जमीनीचा तुकडा सहा लाखांना विकला होता. हे पैसे तिच्या वडिलांनी या मुलीच्या खात्यामध्ये जमा केले होते. ज्यावेळी वडिलांनी या पैशांसंदर्भात विचारणा केली त्यावेळी त्यांना केवळ दोन लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती या तरुणीने दिली. घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:57 pm

Web Title: chhattisgarh son raped a girl mother shoot a video for blackmailing scsg 91
Next Stories
1 राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती
2 हबीब झहीर यांना भारताने गायब केल्याची पाकिस्तानला शंका, म्हणाले….
3 …तर मनमोहन सिंग पाकिस्तानसोबत करणार होते युद्ध; ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून यांचा गौप्यस्फोट
Just Now!
X