छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त परिसर अशी ओळख असलेल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत विशेष तपास पथकातील दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील डब्बामारका परिसरातील जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे. गुरूवारी सकाळपासून बिजापूर, तेलंगण आणि सुकमाच्या सीमेवर नक्षलवादी असल्याच्या माहितीनंतर या ठिकाणी सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणात शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, शोधमोहिमेवरुन परतणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सर्वप्रथम गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.