मुले दत्तक घेऊन नंतर त्यांना वाईट वागणूक दिली जाण्याच्या काही घटना सामोऱ्या आल्यानंतर आता जे पालक मुले दत्तक घेतील त्यांना हिंदू दत्तक कायद्यानुसार बालक दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकार करण्यात येणार आहे.

संबंधित पालक हे बाल न्याय कायदा २०१५ अनुसार मुले दत्तक घेऊ शकतात. हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांना त्यांच्या दत्तक मूल प्रक्रियेस हिंदू दत्तक कायद्यानुसार अधिकृतता देऊ शकतात. बाल न्याय कायद्यात मुलाचा स्रोत व पालकांची पाश्र्वभूमी तपासण्याची तरतूद आहे पण हिंदू दत्तक कायद्यात ही तरतूद नाही त्यामुळे अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात असे दिसून आले आहे. त्यामुळे आता महिला व बालविकास मंत्रालयाने हिंदू दत्तक कायद्यात काही सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यासाठी तयार केली असून त्यात पालकांना मूल दत्तक घेताना त्याची नोंदणी मूल दत्तक  स्रोत प्राधिकरणाकडे करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. सध्या या प्रस्तावाचा मसुदा विविध मंत्रालयांकडे अभिप्रायार्थ पाठवण्यात आला आहे.

Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
mumbai high court evm purchase marathi news
“न्यायालय टपाल खाते आहे का ?”, मतदान यंत्र खरेदीसंदर्भातील याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्याला खडेबोल
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

दोन हिंदू एक करारपत्र सादर करून मूल दत्तक घेऊ शकतात इतकी सोपी प्रक्रिया हिंदू दत्तक कायद्यात आहे. त्यामुळे या कायद्यानुसार मुले दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक आहे पण नंतर यातील मुलांची तस्करी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. दत्तक प्रक्रियेत या कायद्यातील पळवाटा धोकादायक ठरत आहेत त्यामुळे त्यात प्रस्तावित सुधारणा केली तर ते फायद्याचे आहे.

हिंदू दत्तक कायद्यात सुधारणा करून मूल दत्तक घेण्याची नोंद दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे करणे सक्तीचे केल्यास यातील पळवाटा बंद होतील व दत्तक मुले व त्यांचे पालक यांची सगळी माहिती प्राधिकरणाकडे संकलित स्वरूपात राहील, त्यामुळे या प्रस्तावाचे स्वागतच आहे.’ – लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, मूल दत्तक स्रोत प्राधिकरण