चीनमधील वुहानमध्ये सर्वाक प्रथम करोना विषाणूचा प्रसार सुरू झाला होता. दरम्यान, वुहानमधील वायरॉलॉजी लॅबमधून हा विषाणू लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु अनेकदा चीननं या दावा फेटाळला आहे. परंतु आता एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. चीन आता पाकिस्तानला जैविक युद्धाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं यातून सांगण्यात आलं आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये एक गुप्त करार करण्यात आला आहे. याद्वारे चीन पाकिस्तामध्ये धोकादायक जीवाणू, विषाणू आणि इतर जीवाणूंच्या संशोधनात मदत करत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. टाईम्स नाऊनं एएनआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Klaxon ने सूत्रांच्या हवाल्यांनं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि चीनने जैविक शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी तीन वर्षांसाठी एक गुप्त करार केला आहे. वुहान लॅबने संसर्गजन्य रोग आणि संसर्गजन्य रोगांवर जैविक नियंत्रणावरील संशोधनासाठी पाकिस्तानच्या सैन्याच्या सायंस अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनसोबत करार केला असल्याचं या अहवालात अँथनी क्लॅन यांनी नमूद केलं आहे.

चीन आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावा यासाठी आपल्या सीमेबाहेर असे प्रोजेक्ट करण्याचा चीनचा मानस असल्याचं Klaxon ने अहवालात नमूद केलं आहे. तसंच वुहान लॅबनं आर्थिक आणि शास्त्रीय अहवालह आणि साहित्यदेखील दिलं आहे. यासाठी चीन संपूर्णत: आर्थिक मदत करत आहे. तसंच या गुप्त प्रोजेक्टमध्ये कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय काम करता यावं यासाठी तो विद्यापीठ आणि सरकारी आरोग्य विभागातूनही हटवण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे.

भारताविरोधात कट?

भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरोधात उभं करावं यासाठी चीन या प्रोजेक्टशी जोडला गेला असल्याचं भारतीय आणि पश्चिमी गुप्तचर यंत्रणांचं मत असल्याचा दावा काही तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. बायो केमिकल संशोधनासाठी पाकिस्तानचा केंद्र म्हणून वापर करावा आणि इतरांच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावं अशी चीनची इच्छा असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

धोकादायक जीवाणूवर काम

एका वरिष्ठ इंटेलिजन्स सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार DESTO बायोलॉजिकल शस्त्रास्त्रांच्या कार्यक्रमाअंतर्गत अँथ्रेक्सशी निगडित एका प्रोजेक्टशी जोडला गेला आहे. अँथ्रेक्स एक बायोलॉजिकल वॉरफेअर एजंट म्हणून ओळखला जातो. अहवालात दिलेल्या माहितीनुसार चीन आणि पाकिस्ताननं Bacillus Thuringienesis ला आयसोलेच करण्याची यशस्वी चाचणी केली आहे आणि ते Bacillus Anthracis म्हणजेच अँथ्रेक्सशी मिळतजुळतं आहे.

यापूर्वीही एकत्र काम

चीन आणि पाकिस्ताननं यापूर्वीही Crimean-Congo Hemorrhagic Fever Virus (CCHFV) एकत्र काम केलं होतं. पाकिस्तान सध्या अशा लॅबमध्ये यावर काम करत आहे जी सेफ्टी लेव्हल ४ नं युक्त नाही. तर दुसरीकडे डीएनए संशोधन करून विशेष जैविक शस्त्रास्त्र तयार करत असल्याचा आरोप चीनवर केला जात आहे. वुहान इन्स्टिट्यूटने असा दावा केला आहे की दक्षिण युन्नान प्रांतात त्याने वैद्यकीय जीवशास्त्र संस्था स्थापन केली आहे जिथे सुरक्षेच्या उपायांशिवाय क्लास ४ च्या आजारांवर काम सुरू आहे.