22 October 2020

News Flash

फ्रीजमधील पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले करोनाचे सक्रिय विषाणू; चीनचा दावा

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रानं याविषयी दिली माहिती

संग्रहित (REUTERS/Aly Song)

करोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रसार आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर लस निर्मितीचं काम सुरू आहे. अनेक देशात लस निर्मितीवर काम असून, करोनाचं स्वरूप बदलताना दिसत आहे. करोनासंदर्भात नवीन बाब समोर आली आहे. फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर करोनाचे जिवंत विषाणू आढळून आले आहेत.

चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर करोनाचे जिवंत विषाणू असल्याचा दावा केंद्रानं केला आहे. चीनमधील किनारपट्टी भागात असलेल्या किंगदाओ शहरात हे आढळून आलं आहे.

थंड करण्यात आलेल्या पदार्थांना असलेल्या आवरणावर करोनाचे जिवंत विषाणू आढळून आले आहेत. या पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रानं म्हटलं आहे. किंगदाओ शहरात या महिन्यात अनेक करोना रुग्ण आढळून आले. यात परदेशातून आलेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रुग्णालयाशी संपर्क येणार रुग्ण अधिक आहेत.

परदेशातून शीतपदार्थ आयात करण्यामुळे करोना वाढीचा धोका अधिक असल्याचं चीनकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. यापूर्वी काही देशांमध्ये अशा पदार्थांच्या आवरणांची तपासणी करण्यात आली होती. ज्यात करोना विषाणू असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर इंडोनेशियातील सीफूड आणि ब्राझीलमधील चीननं बंदी घातली होती.

थंड अन्न पदार्थांच्या आवरणावर करोना विषाणू आढळून आले असल्याचा दावा चीननं केला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेनं ही बाब फेटाळून लावलेली आहे. अन्न पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 11:58 am

Web Title: china finds active covid 19 virus on frozen food packaging bmh 90
Next Stories
1 एटीएममधून ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास द्यावं लागणार अतिरिक्त शुल्क?
2 बिहारमध्ये ‘जर’ किंवा ‘तर’ नाही, नितीशकुमारच होणार मुख्यमंत्री; अमित शाहांची जाहीर घोषणा
3 लस वितरणाबाबत मोदींकडून पुन्हा आढावा
Just Now!
X