News Flash

करोना रुग्णांची प्रारंभिक माहिती देण्यास चीनचा नकार

या भेटीतून ठोस काहीही हाती लागण्याची आशा मावळली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या चीन भेटीवर गेलेल्या पथकास करोना विषाणूचा प्रसार नेमका कसा व कोठून सुरू झाला याची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे या भेटीतून ठोस काहीही हाती लागण्याची आशा मावळली आहे.

या विषाणूचा प्रसार कसा झाला किंवा नंतर त्यात काय कसे घडत गेले याची प्रारंभिक  स्वरूपातील माहिती चीनने दिली नाही, जी करोनाचे मूळ शोधण्यासाठी गरजेची  होती, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकात सहभागी एका संशोधकाने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचे साथरोगतज्ञ डॉमनिक वेयर यांनी सांगितले, की चीनमधील करोनाच्या १७४ मूळ रुग्णांची माहिती चीनकडे मागितली होती. वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये ही साथ सुरू झाली त्यातील हे पहिल्या लाटेतील रुग्ण होते. त्यांची माहिती चीनने दिली नाही केवळ सारांशवजा जुजबी माहिती दिली त्यावरून काही निष्कर्ष काढणे कठीण आहे. करोनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रारंभिक (कच्च्या) माहितीची गरज होती. ही माहिती निनावी असते. त्या रुग्णांना काय प्रश्न विचारण्यात आल, त्यांनी काय उत्तरे दिली, या माहितीला लाइन लिस्टिंग म्हणतात, तीच माहिती चीनने दिलेली नाही. कुठल्याही साथीचा अभ्यास करताना ही  माहिती आवश्यक असते. त्यांनी सांगितले, की १७४ रुग्णांचा संबंध हुनान बाजारपेठेशी आला होता व आता वुहानमधील हे सागरी पदार्थाचे केंद्र बंद केले आहे. तेथूनच हा विषाणू आल्याचा अंदाज आहे, पण आता त्यावर शिक्कामोर्तब करणे अवघड जाणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे कच्ची माहिती विचारली, पण  त्यांनी दिली नाही.

ही माहिती चीनने का दिली नाही हे समजू शकलेले नाही. गेल्यावर्षीही तेथे पथक गेले होते, त्यापेक्षा यंदा जास्त माहिती मिळाली असली तरी कच्ची माहिती देण्यात आलेली नाही असे शेवटच्या अहवालात म्हटले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेचे पथक जानेवारीत वुहानला गेले. चीनने कच्ची माहिती देण्यास नकार दिल्याची पहिली बातमी वॉल स्ट्रीट जर्नलने शुक्रवारी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:34 am

Web Title: china refuses to provide initial information on corona patients abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘ट्रम्प यांच्यावरील आरोप राजकीय सूडबुद्धीने’
2 देशात दिवसभरात १२,१४३ जणांना करोनाची लागण
3 मी न्यायालयात जाणार नाही; तेथे न्याय मिळत नाही
Just Now!
X