चिनी विमान कंपन्यांवर निर्बंध घालण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. येत्या १६ जूनपासून अमेरिकेतून उड्डाण करण्यास किंवा अमेरिकेत येण्यास चार चिनी कंपन्यांच्या प्रवासी विमानांवर बंदी लागू करण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावानंतर युनायटेड एअरलाईन्स आणि डेल्टा एअरलाईन्सवर चीनने घातलेले प्रवास निर्बंध या आठवडय़ात मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चीनने करारभंग केल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयाचा एअर चायना, चायना इस्टर्न एअरलाईन्ससह चार विमान कंपन्यांना फटका बसणार आहे.