News Flash

जेएनयूचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये राडा, अश्लील चाळे करणाऱ्या प्राध्यापकाच्या अटकेची मागणी

विद्यार्थी प्राध्यापकावर कारवाई व्हावी यासाठी आक्रमक

फोटो सौजन्य -एएनआय

दिल्लीतील वसंत कुंज पोलीस आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूचे विद्यार्थी यांच्यात राडा झाला. जेएनयूतील विद्यार्थिनींवर अश्लील भाष्य आणि टिपण्णी करणाऱ्या प्राध्यापक अतुल जोहरीच्या अटकेची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. लाइफ सायन्स हा विषय शिकवणारे प्राध्यापक अतुल जोहरी यांनी अश्लील इशारे करत होता असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच या प्राध्यापकाच्या अटकेचीही मागणी केली. प्राध्यापक जोहरी विरोधात ९ विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे वर्गातली हजेरी पूर्ण नसल्याने हे विद्यार्थी माझ्यावर आरोप करत आहेत असे प्राध्यापक अतुल जोहरी यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील वसंत कुंज पोलीस ठाण्याबाहेर आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमले होते. या सगळ्यांनी प्रा. अतुल जोहरी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशीही मागणी केली. मोठा हंगामा झाला. पोलिसांनी जे बॅरिकेट्स लावले होते ते विद्यार्थ्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी वसंत कुंज पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. ९ मुलींनी आरोप करूनही पोलिसांनी अजून अतुल जोहरीला अटक का केली नाही असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. आज प्राध्यापक अतुल जोहरीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र प्रा. जोहरी न आल्याने मोठा हंगामा झाला.

या घटनेच्या निषेधार्थ दोन दिवस आधीही अशाच प्रकारचे आंदोलन झाले होते. तेव्हा विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. दोन दिवस होऊनही जोहरींना अटक न करण्यात आल्याने सोमवारी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 8:41 pm

Web Title: clash broke out between police students of jawaharlal national university jnu in front of vasant kunj police station
Next Stories
1 विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट केल्याने महिलेची आत्महत्या
2 आईच कापलेलं मुंडकं घेऊन तो गेला पोलीस स्टेशनमध्ये
3 कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस
Just Now!
X