दूरसंचार खात्याकडून १९ फेब्रुवारीला आदेश जारी 

व्हॉट्सअ‍ॅपवर कुणी आक्षेपार्ह संदेश पाठवला तर आता दूरसंचार खात्याकडे त्याची तक्रार करता येणार आहे, असे शुक्रवारी या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी ज्याला असा संदेश आला आहे त्याने मोबाईल नंबर व संदेशाचा स्क्रीनशॉट ही माहिती ई-मेलद्वारे ccaddn-dot@nic.in.या पत्त्यावर पाठवायची आहे.

जर कुणाला शिवीगाळ करणारा, धमक्या देणारा किंवा अश्लिल व्हॉट्सअ‍ॅप संदेश आला तर त्यात स्क्रीन शॉट घेऊन माहिती द्यावी लागणार आहे. दूरसंचार खात्याचे नियंत्रक आशिष जोशी यांनी सांगितले की, या तक्रारी दूरसंचार सेवापुरवठादार व पोलीस प्रमुख यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात येतील. काही पत्रकार, इतर व्यक्ती यांना आक्षेपार्ह संदेश नेहमीच येत असतात त्यात धमक्याही दिलेल्या असतात. त्यामुळे तक्रार करण्याची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश १९  फेब्रुवारीला जारी करण्यात आला.

कारवाई अपेक्षित

आक्षेपार्ह संदेशांबाबत तक्रार आल्यावर दूरसंचार सेवा पुरवठादारांनी याबाबत त्यांच्या संबंधित ग्राहकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, कारण ग्राहकांनी अर्जात भरून दिलेल्या ग्राहक जाहीरनाम्याचे ते उल्लंघन आहे.