News Flash

दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी

ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याची प्रथा दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोडीत काढली आहे. अजून निवडणुकीची तारीखही जाहीर झालेली नसताना काँग्रेसने २४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

| January 2, 2015 03:27 am

ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याची प्रथा दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोडीत काढली आहे. अजून निवडणुकीची तारीखही जाहीर झालेली नसताना काँग्रेसने २४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये २०१३ मध्ये विजयी झालेल्या सर्व ८ आमदारांचा समावेश आहे. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत गेल्या वेळी काँग्रेसची १५वर्षांची सत्ता गेली होती. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या निवडणूक लढवणार नसून पक्षाच्या प्रमुख प्रचारक राहतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 3:27 am

Web Title: congress declares first list of candidates for delhi assembly elections
टॅग : Congress
Next Stories
1 सरकारला भूसंपादन अध्यादेश संमत करण्याची इतकी घाई का?- राष्ट्रपती
2 पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात पुन्हा बॉम्बस्फोट; दोन जण जखमी
3 BLOG : ‘राष्ट्रभाषा’ हिंदी विरोधाची ५० वर्षे!
Just Now!
X