News Flash

Narendra Modi in Bangladesh: “मोदीजी अजून किती फेकणार, हद्द झाली राव”

मोदींच्या बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याच्या वक्तव्यावरुन चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी पोहोचले असून दोन दिवसांचा हा दौरा आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केलं.

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती : मोदी

दरम्यान ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असं सांगितलं. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर मोदींना अजून किती फेकणार अशी विचारणा केली आहे.

दहशतवादाच्या प्रतिकारासाठी भारत-बांगलादेशाने एकत्र यावे- मोदी

नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी”.

मोदींनी काय म्हटलं आहे –
“मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 8:45 am

Web Title: congress nana patole pm narendra modi bangaladesh tour sgy 87
Next Stories
1 सर्व भारतीय बांगलादेशच्या निर्मितीच्या बाजूने होते तर मोदींना सत्याग्रह कशासाठी केला?; शिवसेना खासदाराचा प्रश्न
2 मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग?; समोर आला ‘हा’ पुरावा
3 Election 2021: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मतदानाला सुरुवात; नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन
Just Now!
X