News Flash

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त मिळाला; कोण होणार अध्यक्ष?

सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधींकडे

सौजन्य- Indian Express

काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या जून महिन्यातील २३ तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. अखेर कार्यसमितीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसला गांधी घरण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तगडं आव्हान मिळू शकतं असं काँग्रेसमधील एका गटाचं म्हणणं आहे.

“परदेशातून मिळणाऱ्या मदतीवरून सतत स्वतःची छाती बडवणे हे निराशाजनक”- राहुल गांधी

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे अनेकांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या शर्यतीत कोण कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गुजरातमध्ये गोशाळेत कोविड सेंटर; रुग्णांवर गोमूत्र व दूधाच्या मदतीने उपचार

पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली हीती. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची संकेत मिळत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत बैठकांमध्ये धुसफूस सुरु झाली होती. २०१४ पासून काँग्रेसची कामगिरी खालावत असल्याची टीका होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 1:46 pm

Web Title: congress president election held on 23rd june rmt 84
टॅग : Congress,Rahul Gandhi
Next Stories
1 दिल्लीतील रुग्णालयात करोनाचा विस्फोट; ८० डॉक्टर, कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह
2 हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
3 ममतांच्या तिसर्‍या मंत्रिमंडळात 43 सदस्यांनी घेतली शपथ
Just Now!
X