कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी सकाळी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते मंगळुरुमध्ये या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. आम्ही जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करु.

मागच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती त्यातील ९५ टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा राहुल यांनी केला. हा जाहीरनामा कर्नाटकाच्या जनतेची ‘मन कि बात’ आहे असे राहुल म्हणाले. आम्ही कर्नाटकाच्या जनतेपर्यंत जाऊन लोकांचे काय म्हणणे आहे, त्यांना काय हवे आहे ? ते ऐकून घेतले असे राहुल म्हणाले.