05 December 2020

News Flash

पुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी

राहुल यांचा भारतीय गोष्टींवर विश्वास नसतो, लष्कर असो वा सरकार वा  नागरिक, ते कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानी मंत्र्याने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर, भाजपने शुक्रवारी काँग्रेसवर टीकेचा भडिमार करत, काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

पुलवामा हल्ल्यात केंद्रीय पोलीस राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले होते. हा हल्ल्याला काँग्रेस व इतर पक्षांनी ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी मंत्र्यानेच हल्ल्याची कबुली दिली असल्याने काँग्रेसने भाजपवर केलेला आरोप खोटा ठरतो. त्यामुळे पक्षाने देशाची माफी मागितली पाहिजे, असे ट्वीट केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधले. राहुल यांचा भारतीय गोष्टींवर विश्वास नसतो, लष्कर असो वा सरकार वा  नागरिक, ते कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. आता पाकिस्तानी मंत्र्यानेच काय म्हटले ते पाहा. पाकिस्तान त्यांच्यासाठी सर्वाधिक विश्वासू राष्ट्र आहे, अशी टीकाही नड्डा यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:23 am

Web Title: congress should apologize in pulwama case bjp demands abn 97
Next Stories
1 खासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात – पीयूष गोयल
2 भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा
3 प्रचारकांच्या यादीतून कमलनाथ बाद
Just Now!
X