पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील करोडो नागरिकांना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरी थांबवण्याचं आवाहन केल्याने भारताला त्याचा फायदा झाल्याचे मत केंब्रिज विद्यापिठामध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासमध्ये म्हटलं आहे. देशभरामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा भारतातील सामाजिक तसेच आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला मात्र या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना घरीच थांबण्याचं आणि करोनासंदर्भातील सर्व काळजी घेण्याचं आवाहन वारंवार केलं होतं. याचसंदर्भात केंब्रिज विद्यापिठामध्ये करोनाच्या कालावधीमध्ये भारत सरकारने जनतेशी साधलेला संवाद या विषयावर अभ्यास केला आहे. करोना कालावधीमध्ये सरकारने प्रसार माध्यमे आणि सामान्यांशी कशाप्रकारे संवाद साधला याचा सविस्तर अभ्यास विद्यापिठातील तज्ज्ञांनी केला आहे.

केंब्रिजमधील या अभ्यासामध्ये  पंतप्रधान मोदींच्या सातत्यपूर्ण रेट्यामुळे भारतीयांना फायदा झाल्याचे म्हटलं आहे. मोदींनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी करोनाशी लढण्यासाठी घरीच थांबण्याचा आणि लॉकडाउनच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्याचा मार्ग निवडल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

मोदींचं लोकांनी ऐकलं

“देशामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या पंतप्रधानांनी अनेकदा लोकांना घरीच थांबण्याचं, लॉकडानच्या नियमांचे पालन करण्याचं, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगअभ्यास तसेच आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याचं आवाहन केलं. त्याचप्रमाणे त्यांनी पीएम-केअर्स फंडासाठी दान देण्याचंही आवाहन नागरिकांना केलं. पंतप्रधानांनी केलेल्या या अवाहानामुळे नागरिकांनी करोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्यासंदर्भात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तसेच लहान लहान रक्कमेचे दान देत करोनाविरुद्ध लढण्यासाठी मोठा निधी उभा करण्यात यश आलं. याचबरोबरच मोदींनी केलेल्या आवाहनाचा इतर क्षेत्रातील कामगारांसाठी दान देण्यावरही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आलं. यामध्ये निर्मिती उद्योग, अर्थिक उलाढालींशी संबंधित उद्योग, ऊर्जा, बांधकाम आणि औषधनिर्मिती उद्योगांसंदर्भातील आवाहनांना चांगला प्रतिसाद मिळाला,” असं केंब्रिजच्या अहवालात म्हटलं आहे.

कुठे छापून आला आहे अहवाल?

हे संशोधन पीलोस वन (PLOS ONE) या नियतकालीकेत ११ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालं आहे. या अलहवासंदर्भातील एक पत्रकही भारत सरकारच्या सर्वाजनिक माहिती विभागाने जारी केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातूनही करोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यास फायदा झाल्याचेही या अहवालात म्हटलं आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये करोनासंदर्भातील पूर्वतयारी, कामांसंदर्भातील निर्णय आणि स्थलांतरणासंदर्भातील निर्णय घेण्यास मदत झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

निधी उभारण्यास मदत

“ते (पंतप्रधान मोदी) अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांममधून जनतेशी संवाद साधायचे. त्यामुळेच १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये कठोर लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगसंदर्भातील नियमांची अंमलबाजवणी अधिक चांगल्या पद्धतीने राबवली होती. याच कालावधीमध्ये पंतप्रधान कार्यालयाने पीएम केअर्स फंडची निर्मिती केली. या माध्यमातून करोना साथीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या खर्चांसाठी लागणारा निधी उभारण्यात आला. लोकांनी लहान लहान देणग्यांच्या माध्यमातून यामध्ये सहभाग नोंदवला ज्यामुळे निधी उभारण्यास मदत झाली,” असं अहवालात म्हटलं आहे. अनेकदा सोशल मिडियावरुन मोदींनी आवाहन केलं. फॉर्वडेड मेसेजे, सतत यासंदर्भातील सोशल मिडियावर करण्यात आलेल्या जाहिरातींचा चांगला फायदा झाला असा उल्लेखही अङवालामध्ये आहे.

पगार न कापण्याचं आवाहन

आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या उद्योगांना आणि उच्च वर्गातील लोकांनी गरजुंना मदत करावी असं आवाहन केलं. तुमच्याकडे काम करणाऱ्यांचा पगार कापू नका असंही मोदींनी वारंवार सांगितलं. करोना लॉकडाउनमुळे त्यांना कामावर येणं शक्य नसेल तरी त्यांना पगार द्या असं मोदींनी आवाहन केलं होतं. या सर्वांमधून मोदींनी मानवतेवर अधिक विश्वास ठेवा असं सांगत एकमेकांना मदत करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिल्याचं अहवालात म्हटलं आहे.