देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ५७० करोनाबाधित आढळले असून ४३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३८ हजार ३०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३३ लाख ४७ हजार ३२५ झाली असून आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ६० हजार ४७४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६४ टक्क्यांवर आहे.

देशात सध्या ३ लाख ४२ हजार ९२३ सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहेत. तर करोनामुळे आतार्यंत ४ लाख ४३ हजार ९२८ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटिव्हीटी रेट सध्या १.९३ टक्के असून हा रेट गेल्या ८३ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर असून गेल्या १७ दिवसांपासून हा दर ३ टक्क्यांपेक्षा खाली आहे.

केरळमध्ये रुग्णसंख्येत घट..

सर्वात जास्त संसर्ग असलेल्या केरळमध्ये रुग्णसंख्या घटत आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १७ हजार ६८१ रुग्ण आढळले असून २०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात ६४ लाख ५१ हजार ४२३ जणांचं लसीकरण करण्यात आलंय. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ७६ कोटी ५७ लाख १७ हजार १३७ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.