संपुर्ण देश करोना महामारीचा सामना करत आहे. अकेज जणांना करोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका करोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ईसीएमओ (ECMO) प्रक्रीया आणि  व्हेंटिलेटरवर १०९ दिवस ठेवण्यात आले. दरम्यान, या रुग्णाने करोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. चेन्नईच्या रेला हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की, या करोना बाधित रुग्णास फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हा ५६ वर्षीय रुग्ण सुमारे १०९ दिवस रुग्णालयात राहिला. या दरम्यान, या रुग्णाला एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन सपोर्टवर (Extracorporeal membrane oxygenation) ठेवण्यात आले. या यंत्राद्वारे रुग्णाला शरीराबाहेरून रक्तात ऑक्सिजन दिला जातो.

हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की हे चमत्कारापेक्षा कमी नाही, कारण आजपर्यंत ९ आठवड्यांपेक्षा जास्त काळ ECMO वर असलेला रुग्ण फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय बरा झाला नाही, परंतु मुदिज्जा नावाच्या या रुग्णाने ECMO वर १०९ दिवस घालवले आणि त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

corona update: देशात ३४,४५७ नवीन करोना रुग्णांची नोंद, ३७५ जणांचा मृत्यू

रुग्णालयाने सांगितले की, एप्रिल महिन्यात मुदिज्जाला करोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅन केल्यानंतर असे आढळून आले की, संक्रमणादरम्यान त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जास्त संक्रमन झाले आहे. हॉस्पिटलायझेशनच्या वेळी मुदिज्जाची ऑक्सिजन पातळी ९२ टक्के होती. त्यावेळी, मुदिज्जाला दर मिनिटाला १० लिटर ऑक्सिजनची गरज होती. परिस्थितीचे गांभीर्य समजून डॉक्टरांनी मुडिझाला ECMO वर ठेवले होते.

भारतात डेल्टामुळे नवा करोनाउद्रेक

हॉस्पिटलमध्ये मुदिज्जावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, सुमारे ५० दिवस मुदिज्जाला ईसीएमओवर ठेवल्यानंतर त्याची प्रकृती सुधारू लागली. हे पाहून आम्ही उपचार पुढे करण्याचा निर्णय घेतला. आम्ही फुफ्फुस प्रत्यारोपणाचा विचारही केला नाही. डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या डोळ्यांसमोर एक चमत्कार पाहिला. आम्ही त्यांना पुढील दोन आठवडे ट्रेकिओटॉमीसह किमान व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले. त्यानंतर २९ जुलै २०२१ रोजी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढून टाकण्यात आले.