News Flash

Corona Vaccine: स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

देशात काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे. देशात १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस उपचारासाठी वापरण्यात येत आहे.. स्पुटनिक व्हीमुळे भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता तिसरी लस मिळाल्यामुळे भारतासाठी हा दिलासा ठरणार आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६०हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे.

कॉंग्रेसचे नेते मल्लुकर्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पुटनिक व्हीच्या लसींचे दीड लाख डोस भारतात पोहोचले असल्याची माहिती दिली. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानेही भारतात उत्पादनांसाठी स्थानिक कंपन्यांशी करार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 10:04 am

Web Title: corona vaccine 1point 5 lakh doses of sputnik v vaccine introduced in india abn 97
Next Stories
1 शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यास जात असलेल्या सामाजिक कार्यकर्तीवर बलात्कार
2 “तुमच्या देवाचे हात रक्ताने बरबटलेत, लोक श्वासासाठी तडफडतायत आणि…”; ‘अमेरिकेतील मोदी भक्तां’ना खुलं पत्र
3 ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथ ग्रहण सोहळा, ४३ मंत्र्यांचा समावेश
Just Now!
X