गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या ५४०६९ प्रकरणांची नोंद झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,००,८२,७७८ इतकी झाली आहे. याच काळात १३२१ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे करोनामृत्यूंचा आकडा ३,९१,९८१ वर पोहोचला आहे.

करोनाबाधितांची एकूण संख्या ६,२७,०५७ इतकी कमी झाली असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या २.०८ टक्के आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढून ९६.६१ टक्के झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

बरे होणाऱ्यांची संख्या सलग ४२व्या दिवशी संसर्गीतांपेक्षा जास्त आहे. बरे होणाऱ्यांचा आकडा वाढून २,९०,६३,७४० इतका झाला असून, मृत्युदर १.३० टक्के इतका आहे. करोना संसर्गाचा शोध घेण्यासाठी बुधवारी देशात १८,५९,४६९ चाचण्या करण्यात आल्या. यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ३९,७८,३२६६७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांतील १३२१ करोनामृत्यूंमध्ये ५०८ महाराष्ट्रातील, १६६ तमिळनाडूतील आहेत.