21 October 2020

News Flash

“करोनाला आपण हरवू शकत नाही…” WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

WHO च्या प्रमुखांच्या वक्तव्यामुळे वाढली जगाची चिंता

आपण करोनाला हरवू शकत नाही असं वक्तव्य आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केलं आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हा इशारा दिला आहे. करोना काळातून सावरण्यासाठी आता अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशात WHO च्या महासंचालकांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली. दुबई मध्ये एका हेल्थ फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

WHO ने गेल्याच आठवड्यात करोना व्हायरसची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा दिला होता. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लोक लॉकडाउनला कंटाळले आहेत. COVID 19 मुळे आतापर्यंत जगभरात ४ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात लाखो लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. अमेरिका, आशिया खंडातल्या काही भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यूरोपमध्ये प्रतिबंधात्मक उपायही सुरु करण्यात आले आहेत.

या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मात्र यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं आहे. सध्याच्या घडीला हा रोग जगभरात त्याचे पाय पसरतो आहे. दुबईत झालेल्या व्हर्चुअल फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आपल्याला ठाऊक आहे की करोना ही एक महामारी आहे. या महामारीमुळे आरोग्याचं संकट सगळ्या जगावर ओढावलं आहे. इतकंच नाही तर आर्थिक संकट, सामाजिक संकट आणि अनेक देशांवर राजकीय संकटही ओढावलं आहे. करोनाचा परिणाम येणाऱ्या दशकांवर पाहण्यास मिळेल असंही WHO चे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 8:15 pm

Web Title: coronavirus pandemic still accelerating says who chief in dubai health forum scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 रस्त्यातला बाईक स्टंट जीवावर बेतला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2 एकेकाळी अन्नासाठी भीक मागणारे हात करोना काळात झाले रक्षण करणारे हात
3 Good news: ‘सिप्रेमी’ करोनावर प्रभावी ठरणारं आणखी एक औषध भारतात होणार उपलब्ध
Just Now!
X