News Flash

सिरमला मोदी सरकारचा दणका! ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला

टीकेनंतर आधी देशवासियांना प्राधान्य देण्याची भूमिका

कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती.

भारताला सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेलाही जबर धक्का बसला आहे. यामुळे देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकारण्यात आली आहे.

राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे.

“कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सागंण्यात आलं आहे. खासगी रुग्णालयंदेखील हे लसीचे डोस मिळवू शकतात,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसींच्या कुप्यांवर असणारे लेबल बदलावे लागणार आहेत. युकेला पुरवठा करण्यासाठी पँकिंग करण्यात आल्याने त्यांच्यावर वेगळे लेबल होते. पण आता स्थानिक बाजारात जाणार असल्याने कुप्यांवरील लेबल बदलावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 11:32 am

Web Title: covid 19 cental government rejects sii plea to export 50 lakh doses of covishield to uk sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Covid 19: बनावट रेमडेसिविरची विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्त; विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक
2 रुग्णवाढीला ब्रेक, पण मृत्यूचं संकट कायम! करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर
3 अमेरिका एक पाऊल पुढे… १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी
Just Now!
X