24 September 2020

News Flash

कॅमेरून यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव

पनामा कागदपत्रांबाबत चौकशी पथक स्थापन, करविवरणपत्रेही प्रकाशित

| April 11, 2016 01:51 am

पनामा कागदपत्रांबाबत चौकशी पथक स्थापन, करविवरणपत्रेही प्रकाशित
पनामा पेपर्समधील माहितीनंतर अडचणीत आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी कर विवरणपत्रे प्रकाशित केली आहेत. पनामा पेपर्स प्रकरणी चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. कॅमेरून यांच्या वडिलांनी परदेशात गुंतवणूक केली होती व त्यातून त्यांना लाभ मिळाला होता, असे पनामा पेपर्समधील माहितीतून उघड झाले आहे. त्यामुळे कॅमेरून यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. ‘टोरिज आउट, कॅमेरून मस्ट गो’ असे फलक घेऊन लोकांनी डाऊनिंग स्ट्रीटवरून मोर्चा काढला व कॅमेरून यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नंतर कॅमेरून यांनी २००९-१० व २०१४-१५ या वर्षांतील करविवरणपत्रे व कर भरल्याच्या पावत्या प्रकाशित केल्या आहेत. २०१४-१५ मध्ये त्यांनी २ लाख पौंडाच्या प्राप्तीवर ७६,००० पौंड इतका कर भरला आहे. करविवरणपत्रे प्रसिद्ध करणारे ते पहिले ब्रिटिश नेते ठरले आहेत. त्यात तीन पानी माहितीही आहे. कॅमेरून यांनी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या उन्हाळी अधिवेशनात केलेल्या भावपूर्ण भाषणात परदेशातील मालमत्तेतून लाभ झाल्याची कबुली दिली होती.
हे प्रकरण आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकलो असतो पण आता यातून धडा शिकलो आहोत, असे त्यांनी सांगितले होते. कर भरण्याबाबत शंका दूर करण्यासाठी त्यांनी सहा वर्षांतील खात्यांची माहितीही दिली आहे. त्यांना त्यांच्या आईने २ लाख पौंड भेट दिले होते त्यामागे कर चुकवण्याचा हेतू होता, हा संशय अजून कायम आहे. २०११ मध्ये त्यांच्या आईने त्यांच्या खात्यात दोनदा एक लाख पौंड जमा केले आहेत. त्यात ८० हजार पौंडाचा वारसा कर चुकवला आहे, असा दावा वृत्तपत्रांनी केला आहे. कॅमेरून यांचे वडील आयन कॅमेरून यांची परदेशात ब्लेअरमोअर होल्डिंग ही गुंतवणूक निधी कंपनी होती, त्यातून पंतप्रधानांनाही लाभ झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2016 1:51 am

Web Title: david cameron panama papers
टॅग David Cameron
Next Stories
1 नासाच्या केप्लर अवकाशयानात बिघाड
2 एनआयटीमध्ये अखेर शांतता
3 पनामा कागदपत्रांतील माहितीबाबत तपास सुरू – जेटली
Just Now!
X