03 August 2020

News Flash

बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनानंतर भारतीय रेल्वेत क्रांतीकारी बदल होणार-गोयल

रेल्वेची व्याख्या येत्या काळात बदलणार

केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल (फोटो सौजन्य एएनआय)

बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनानंतर भारतीय रेल्वेमध्ये क्रांतिकारी बदल होतील असे वक्तव्य केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले आहे. एवढेच नाही तर, भारतात बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याने रेल्वेत रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पियूष गोयल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने निर्देश दिले आहेत. भारतीय वाहतूक क्षेत्राची व्याख्या बदलण्याचे आव्हान आमच्यावर आहे. यामुळे येत्या काळात रेल्वेमध्ये महत्त्वाचे बदल होताना दिसतील असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

१४ सप्टेंबरला अहमदाबादमध्ये देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमीपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे या कार्यक्रमाला हजर असणार आहेत. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेने ८८ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. ०.१ टक्के दराने ५० वर्षांच्या मुदतीसाठी हे कर्ज भारताला देण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशाला मिळालेले हे सर्वात स्वस्त कर्ज आहे अशीही माहिती पियूष गोयल यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2017 11:00 pm

Web Title: day after tomorrow railways will be transformed revolutionized piyush goyal
टॅग Piyush Goyal
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाचा ‘सहारा’ला दणका, आणखी वेळ देण्यास नकार
2 इंग्रजीत संवाद साधला म्हणून दिल्लीत पाच जणांच्या टोळक्याकडून तरूणाला मारहाण
3 ‘भारत रोहिंग्या मुसलमानांना बाहेर काढू शकत नाही’
Just Now!
X