News Flash

सतारवादक पं. देबू चौधरी यांच्या पाठोपाठ करोनामुळे त्यांच्या मुलाचेही निधन

प्रतीक चौधरी हे ४९ वर्षांचे होते.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे देखील करोनामुळे निधन झाले आहे. काल दिल्लीमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पवन झा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक चौधरी यांनी वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले. त्यांनी गुरु तेग बहादुर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

‘ज्येष्ठ सतारवादक पंडीत देबू चौधरी यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये प्रतीक यांच्यावर उपचार सुरु होते. काल प्रतीक यांनी अखेरचा श्वास घेतला’ या आशयाचे ट्वीट पवन झा यांनी केले आहे.

सीतू महाजन कोहली यांनी ‘प्रतीक यांना वडील देबू चौधरी यांच्या शेजारी रुग्णालयात बेड हवा होता. वडिलांच्या निधनानंतर एका आठवड्यामध्येच प्रतीक यांचे निधन झाले. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही’ असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 1:45 pm

Web Title: days after sitar maestro debu chaudhuris demise son prateek chaudhuri dies avb 95
Next Stories
1 Oxygen Crisis: कर्नाटक हायकोर्टाचा आदेश जैसे थै!; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली
2 “फेक ट्विटर आयडी बनवून हलकट व्यक्तींवर पैसे वाया घालवण्यापेक्षा…”; भाजपा खासदाराचा खोचक सल्ला
3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका डॉक्टरचा राजीनामा, तर एक डॉक्टर रजेवर
Just Now!
X