News Flash

अहमदाबाद : कापड गोदामास आग लागून झालेल्या भीषण स्फोटात ९ जणांचा मृत्यू

आणखी चार जण ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची शक्यता

गुजरातमधील अहमदाबाद येथे एका कापड गोदामास आग लागल्यानंतर, इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आणखी चार जण ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची देखील शक्यता वर्तवली गेली आहे.

स्थानिक प्रशासनाकडून या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे. शिवाय, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

अग्निशामक दलासह पोलीस व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मदतकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.  या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

”अहमदाबामध्ये गोदामाला आग लागून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो. प्रशासनाने सर्वोतोपरी मदत करावी.” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 5:56 pm

Web Title: death toll in the fire at a textile godown on piplaj road in ahmedabad reaches nine msr 87
Next Stories
1 “अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी AK-47 घेऊन जाणारे मुंबई पोलीस भेकड”
2 ‘आमची सुद्धा वकिलांची फौज तयार’ जो बायडेन यांचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर
3 आघाडीवर असलेल्या जो बायडेन यांनी जिंकलेली राज्ये आणि इलेक्टोरल व्होटस
Just Now!
X