केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यमचे संस्थापक कमल हसन यांनी सोमवारी पाठिंबा दिला. जो देश कृषीक्षेत्राचा आदर करीत नाही तो अधोगतीला जाईल, असेही हसन यांनी म्हटले आहे. शेतकरी हे ‘अन्नदाता’ असल्याचेही हसन यांनी म्हटले आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या पक्षाचे एक शिष्टमंडळही दिल्लीला पाठविले होते. जो देश कृषीक्षेत्राचा आदर करीत नाही तो अधोगतीला जातो, असे आपल्या देशात घडू नये, शेतकरी हे अन्नदाता आहेत, असेही  त्यांनी म्हटले आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकान्त हे पुढील महिन्यात राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, त्यांनी आघाडीसाठी आपल्याकडे हात पुढे केला तर, असे विचारले असता हसन म्हणाले की, आम्ही ४० वर्षांपूर्वीच हातमिळवणी केली आहे.