संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता मिलिटरी पोलिसांत २० टक्के महिलांची जवान म्हणून भरती होणार आहे.

लष्कराच्या मिलिटरी पोलिसांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, महिलांना जवान म्हणून वर्गीकृत पद्धतीने यात सामील केले जाणार आहे. त्यामुळे लष्काराच्या कोर ऑफ मिलिटरी पोलिसांत २० टक्के महिलांची भरती करण्यात येणार आहे.