News Flash

भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांना करोना व्हायरसची लागण

करोनाची बाधा झालेले सरकारमधील पहिले वरिष्ठ अधिकारी

भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. अजय कुमार यांना सौम्य ताप आला होता व त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे टेस्ट करण्यात आली. मंगळवारी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

करोनाची बाधा झालेले सरकारमधील ते पहिले वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य वरिष्ठ नोकरशहा, लष्करी अधिकारी आणि मंत्री यांची करोना चाचणी झाली का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. रायसीना हिल्स येथे साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय आहे. अजय कुमार यांना करोनाची बाधा झाल्यानंतर ३५ अधिकारी होम क्वारंटाइन झाल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाने अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु केला आहे. साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्याचे निर्जतुकींकरण करण्यात आले आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 9:27 am

Web Title: defence secretary ajay kumar tests positive for covid 19 dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लडाखमध्ये चीन दोन पावलं तर भारत एक पाऊल मागे
2 अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना
3 रेल्वेमंत्री गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी
Just Now!
X