News Flash

दिल्लीतील थरारक दृश्य : नाल्याच्या पाण्यात वाहून गेलं दुमजली घर

पावासामुळे दोन जणांचा मृत्यू

दिल्लीत पावसानं कहर केला असून सकाळपासून विविध भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. एका नाल्यात दुमजली घर वाहून गेल्याची दृश्येही समोर आली आहेत.

दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. प्रसिद्ध मिंटो ब्रिजच्या खालीही पाण्याचा मोठा डोह तयार झाला आहे. याच ब्रिजच्या खाली पाण्यात एकाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. तो मृतदेह एका पिकअप ड्रायव्हरचा होता.

आयटीओ परिसरातील अन्ना नगर येथली झोपडपट्टीतील एक घर नाल्यात अक्षरशः वाहून गेल्याचीही घटना घडली. नाल्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता. शिवाय वाहत्या पाण्यामुळे घरांच्या खालचा भागही काही प्रमाणात आधीच वाहून गेला होता. थोड्या वेळानं मग दुमजली घरही नाल्यात कोसळले आणि नाहिसे झाले.


सुदैवानं या घरात कोणी नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 1:31 pm

Web Title: delhi a house collapsed in the slum area of anna nagar near nck 90
Next Stories
1 राज्यस्थानमध्ये नवीन राजकीय अंक, मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले आणि…
2 बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन
3 भारतात समूह संसर्गाला सुरूवात, परिस्थिती भयावह; IMA चा इशारा
Just Now!
X